Chilli Pickle – Vidarbha Recipe
This mouth watering pickle recipe is shared by Ms. Trushna Mankar as she learnt from her mother.
You can visit her YouTube channel – Marathi Pangat.
To retain the authenticity of the recipe, it is shared in Marathi. If you want it translated, feel free to ask us!
मिरचीचे लोणचे
Print RecipeIngredients
- हिरव्या मिरच्या - पाव किलो
- मोहरीची डाळ - १०० ग्रॅम
- हळद - १ छोटा चमचा (टी स्पून)
- लोणचे मसाला - बेडेकर - २ मोठे चमचे (टेबल स्पून)
- तेल - अर्धी वाटी
- गूळ - १ वाटी
- हिंग
- मीठ - चवीप्रमाणे
- लिंबू - ८-१० लिंबांचा रस
Instructions
हिरव्या मिरच्या चिरून घेणे.
गूळ किसून घेणे
मिरच्या चिरून त्यांना अर्धा तास हळद आणि मीठ लावून ठेवणे.
तेल गरम करून मग कमी आचेवर ठेवून मोहरीची डाळ घालून फोडणी करणे. मोहरीची डाळ लगेच जळते म्हणून कमी आचेवर ठेवणं महत्वाचं .
मग त्यात हिंग, लोणचे मसाला आणि अर्धी हळद घालायची.
हि फोडणी गरम असतानाच मिरच्यांवर घालणे.
त्यात मीठ, किसलेला गूळ आणि ८-१० लिंबाचा रस घालून मिक्स करणे
आता बरणीत भरून ठेवणे.
हे लोणचे टिकण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवायला लागते.
८ - १० दिवसात लोणचे मुरते. मग खायला सुरवात!
Notes
मिरची मोठी चिरली तर मुरल्यावर कमी तिखट होते. पराठे, ठेपले, थालीपीठ ह्यांच्याबरोबर हे लोणचे छान लागते.